दुर्दैवी! मुक्ताईनगरात विज पडून तरुण ठार, दोन जखमी

सप्टेंबर 20, 2022 5:52 PM

Muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यात दुपारी तिनच्या सुमारास विजा़च्या गडगडाटासह आलेल्या पावसात वीज कोसळल्याने उचंदे शिवारातील एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन अन्य दोघा जखमीवर उपचार सुरू आहे.

jalgaon 57 jpg webp

शत्रुघ्न काशिनाथ नमायते (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. तालुक्यात आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजा़च्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. उचंदे शिवारातील माणिकराव जगन्नाथ पाटील यांच्या शेतात रोजंदारीने कामावर गेलेला तरुण शत्रुघ्न काशिनाथ नमायते याचा अचानक वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला तर या घटनेत शेतमालक माणिकराव पाटील यांचा मुलगा गणेश पाटील व एक अन्य मजुर मुकेश अशोक पाटील हे दोघे गंभीररीत्या भाजले गेले‌. जखमींना पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले आहे. संकेत पाटील व अमोल नमायते यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

मयत शत्रुघ्नच्या पश्चात आई-वडील,भाऊ,पत्नी,एक मुलगा भावेश वय १२, एक मुलगी वेदिका वय ६ असा परीवार असुन शांत, मनमिळाऊ,साधा सरळ स्वभाव असलेला शत्रुघ्न मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.गावासह परीसरातुन या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाकडुन शत्रुघ्नच्या कुटुंबाला मदत मिळावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now