Bhhusawal news-जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण दिवसेनदिवस वाढतच असल्याचे दिसून येते आहे. भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे राहणाऱ्या १५ वर्षी अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सुनसगाव येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबांसह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवार १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतु ती कुठेही मिळून आल्याने अखेर त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहे.