⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

गणेश विसर्जन : माळपिंप्रीतील दोन तरुणांचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू!

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्रासह जिल्ह्यात शुक्रवारी रोजी विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आले. श्रींची मिरवणुकीनंतर नदी, कालवे आणि धरणातून सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करताना जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्ब्ल तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर माळपिंप्री येथील पाझर तलावात देखील दोन तरुणाचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

किशोर आत्माराम पाटील (वय 31), नरेश संजय पाटील (वय 24, दोघे रा.माळपिंपरी) अशी मयतांची नावे आहेत. जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील पाझर तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. दरम्यान, या दोन्ही तरुण पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवार, 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता ही दुर्दैवी घटना घडली तर चौघे मात्र सुखरूप बचावले.

दुर्दैवी : बालक गणेश विसर्जन करताना पाण्यात बुडाला, गणेशभक्त तरुणाने उडी घेऊन बालकाचे प्राण वाचविले, मात्र..
किशोर राजू माळी (वय ३०) या तरुणाला कांग नदी पात्राच्या पुलावर गणपती विसर्जनासाठी आलेला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसले, त्यांनी लागलीच उडी घेऊन त्या मुलाचे प्राण वाचविले. मात्र किशोरचा बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला. किशोर या तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, लहान भाऊ असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माळी परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश विसर्जनाला घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जामनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुर्दैवी : खडकीचा बालक गणेश विसर्जनासाठी गेला, मात्र..
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावातील सौरव शत्रुघ्न मोरे (वय १७) हा श्री विसर्जनासाठी तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गेला, त्याने पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सौरव मोरेचा पाण्यात बुडू लागला तर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणार्‍या कामगारांनी धाव घेत सौरवला बाहेर काढले. मात्र, तो पर्यंत उशीर झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौरवच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परीवार आहे.

दुर्दैवी : कांताई बंधाऱ्यात तरूणाचा मृत्यू
जळगावच्या समता नगरातील भगवान नामदेव राठोड (वय १८) या तरूणाचा कांताई बंधाऱ्यात श्री विसर्जनादमऱ्यान बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दि.९ रोजी चार वाजेचच्या सुमारास घडली.