सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, मात्र चांदी वाधरली

सप्टेंबर 20, 2022 11:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । आज व्यवहाराच्या सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र चांदी पुन्हा महागली आहे. आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित १० रुपयाची घसरण दिसून आलीय. तर एक किलो चांदीच्या भावात २३० रुपायची वाढ झालेली दिसून आलीय. Gold Silver Price Today

gold silver jpg webp

आजचा MCX वरील भाव
आज सकाळी 9:10 वाजता MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत १० रुपयांनी घसरून ४९, २९२ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदीचा एक किलोचा भाव २३१ रुपयांनी महागला असून ५६,९१५ रुपायांवर व्यवहार करत आहे.

जळगावमधील दर
दरम्यान, जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास ४६, ३०० इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास ५०, ५५० रुपये इतका आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोने दरात घसरण दिसून आली. गेल्या सोमवारी सोने ५१, ४०० तर मंगळवारी ५१, १५० रुपये तर बुधवारी ५१, २०० रुपये, गुरुवारी ५०, ८०० व शुक्रवारी ५०, ६५० इतका होता. म्हणजेच गेल्या व्यापार सप्ताहात सोने जवळपास ११०० रुपयांनी घसरलेले दिसून आले.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now