मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात

सप्टेंबर 19, 2022 7:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या मंगळवार, 20 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दुपारी ३ वाजता जळगाव विमानतळवर पोहचलीत. त्यानंतर पाळधी, मुक्ताईनगर येथे रवाना होणार आहेत.

eknath shinde jpg webp

मुख्यमंत्री शिंदे यांचे दुपारी 3 वाजता जळगाव विमानतळवर आगमन होईल, त्यानंतर मोटारीने पाळधी, ता. धरणगावकडे रवाना होणार असून दुपारी 3.45 वाजता ते पाळधी येथे पोहचतील. दुपारी 4 वाजता त्यांच्या हस्ते पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहेत. सायं. 4.30 वा.पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना होणार आहेत. सायं. 5.30 वा. मुक्ताईनगर येथे जाहिर सभा असेल. रात्री सोईनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे रवाना होतील. रात्री सोईनुसार जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथुन शासकीय विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now