जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आलीय. मात्र दुसरीकडे चांदी महागली आहे.

MCX वर काय आहे भाव?
आज सोमवारी MCX वर 24 कॅरेट सोन्याचा भाव १५० रुपयांनी घसरून ४९,२३० रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज चांदीचा प्रति किलोचा भाव ११० रुपयांनी वाढला असून त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर ५६,८२६ रुपये इतक्यावर व्यवहार करत आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील दर
दरम्यान, जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास ४६,३०० इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास ५०,६०० रुपये इतका आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोने दरात घसरण दिसून आली. गेल्या सोमवारी सोने 51,400 तर मंगळवारी 51,150 रुपये तर बुधवारी 51,200 रुपये, गुरुवारी 50800 व शुक्रवारी 50,650 इतका होता. म्हणजेच या व्यापार सप्ताहात सोने जवळपास 1100 ते 1200 रुपयांनी घसरलेले दिसून येतेय.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.












