कुसुंबाच्या तरुणाचा विषारी औषध घेतलेने उपचारादरम्यान मृत्यू

सप्टेंबर 18, 2022 4:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरूणाचा विषारी औषध घेतलेने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 5 jpg webp

ज्ञानेश्वर सोपान पाटील (वय ३९) रा. कुसुंबा ता. जि.जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. [पाटील हा तरूण येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पाटील याने राहत्या घरी १३ सप्टेंबर रोजी विषारी औषध घेतले. त्याला अत्यवस्थ वाटत असल्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. शनिवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक साईनाथ मुंडे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now