जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक शाळेच्या व्यायामशाळेतून व्यायामशाळेचे साहित्य लांबवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम किसनसिंग पाटील (51, ओझरखेडा) यांच्या फिर्यादीनुसार, ओझरखेडा येथील व्यायामशाळेच्या सिमेंट दरवाज्याची फ्रेम तोडून चोरट्यांनी 10800 रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेटस, 10 हजार 980 रुपये किंमतीचे डंबेल्स लांबवले. हा प्रकार 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान घडला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.