मुक्ताईनगरत सुषमा अंधारे यांचे महाप्रबोधन यात्रेचे लावलेले बॅनर फाडले

Muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘शिवसेना’ गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे महाप्रबोधन यात्रेचे लावलेले बॅनर फाडल्याची घटना मुक्ताईनगरात उघडीस आली आहे. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जिल्हा भरातील पाच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर मध्ये या सभेची युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांच्या नेतृत्वात सभेची जोरदार पूर्वतयारी सुरू होती. सुषमाताई अंधारे यांच्या आधीच्या झालेल्या सभांमध्ये झालेली गर्दी तसेच विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलेला होता त्यामुळे मुक्ताईनगरच्या सभेमध्ये सुषमाताई अंधारे यांच्या भाषणाची मुक्ताईनगर तालुक्या सह जिल्हाभरातील जनतेचे लक्ष लागून होते परंतु सभेच्या एक दिवस आधी जिल्हाधिकारी जळगाव यांनी सभेची परवानगी नाकारल्यामुळे सभा होऊ शकली नाही.

परंतु या सभेसाठी संपूर्ण शहरांमध्ये होर्डिंग बॅनर लावण्यात आलेले होते. या बॅनर पैकी एसटी बस डेपो जवळील रोडच्या कडेला लावण्यात आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘शिवसेना’ यांचे महाप्रबोधन यात्रा प्रचारार्थ लावलेले बॅनर दि. 5 रोजी च्या रात्री 11 ते 11:45 च्या दरम्यान अज्ञात इसमाने फाडून नुकसान केले. या प्रकरणी अज्ञाता विरोधात भांदवि कलम 427 तसेच 500 प्रमाणे मुक्ताईनगर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे.