जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । व्यावसायिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील रोकड तसेच हातातील अंगठी असा ३ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना जळगाव शहारत घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे.
निलेश मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा मढी चौक) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. जळगाव शहरातील मुक्ताई पार्क परिसरात सुरेंद्रकुमार शंकरलाल राका वय ५२ हे वास्तव्यास आहेत. ऑडीटर कॉलनीत सुरज ज्वेलर्स येथे १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरेंद्रकुमार राका यांना एकाने मारहाण करुन त्यांच्याजवळील २ हजार ५७० हजार रुपयांची रोकड तसेच १ हजार रुपयांची नवग्रहाची अंगठी जबरीने चोरुन पसार झाला. घटनेनंतर सुरेंद्र कुमार राका यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली.
या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या संशयित नितेश मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा मढी चौक) यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.