जळगाव शहर

रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । जी.एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालय वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असतात या अनुषंगाने जी.एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली “राष्ट्रीय हिंदी दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

नंदिनी पाटील या विद्यार्थिनीने स्वागतगीताने केल्यानंतर हिंदी विभागप्रमुख प्रा.मीनाक्षी पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले. तसेच कार्यक्रमात अकरावी-बारावी वर्गाच्या विध्यार्थ्यानी हिंदी भाषेचे महत्व सांगणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण केले. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी सर्वाना हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत हिंदीचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हिंदी भाषेचे महत्व सांगणाऱ्या पथनाट्याचे कौतुकही केले. त्या म्हणाल्या भविष्यात या मुलांचे विचारच भारताला सक्षम बनवतील. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रा. मिनाक्षी पाटील यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेशी निगडित विविध बौद्धिक खेळ खेळविले.यावेळी महाविद्यालयातील वातावरण पूर्णपणे हिंदीमय झाले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पाटील या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमासाठी प्रा. संदीप पाटील, प्रा. शीतल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. गायत्री भोईटे, प्रा. प्रियंका मल, प्रा. राहुल यादव, प्रा. मुकेश सदानशिव, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी, प्रा.निकिता वालेचा व इतर शिक्षकेतर कर्मचारी अनिल सोनार व संतोष मिसाळ यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button