जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । एक गतिमंद तरुणी अत्याचारातून अडीच महिन्यांची गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडला आहे. घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात मागासवर्गीय समाजातील २२ वर्षीय गतिमंद तरुणीवर गावातच राहणाऱ्या ज्योतीराम पांडुरंग पाटील वय २२ याने अत्याचार केल्या असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, गेल्या चार ते पाच महिन्यापासून मध्यरात्री पीडीतेची आई झोपलेली असताना पीडितेवर हा नराधम अत्याचार करायचा. दोन महिन्यांपूर्वी पिढीतेच्या नातेवाईकांनी ज्योतीराम पाटील याला दुष्कृत्य करताना रंगेहात पकडले होते. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्याला याबाबत समजही दिली होती. त्यानंतर एके दिवशी पीडित तरुणी व तिची आई या दोघीही आजारी पडल्या. या दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करताना पीडित तरुणी ही अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.
यासंदर्भात पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी गावातील पंचायत समोर घटना कथन केल्यानंतर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याला पीडिते सोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु त्याने प्रस्ताव नाकारल्यामुळे अखेर पीडित मुलीच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयित आरोपी ज्योतिराम पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भरत काकडे हे करीत आहेत