आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी ‘हे’ आणणार भारताचे शिलेदार
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या मैदानात उतरणार आहे. अशावेळी संपूर्ण भारत आपला संघ जिंकू हीच प्रार्थना करत आहे. यातच आता जसप्रीत बुमराह संघात पुन्हा आला आहे. यामुळे भारताचा संघ अजून ताकदवान झाला आहे.
16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा विश्वचषक खेळण्यात येणार आहे. आयसीसी ने केलेल्या घोषणेनुसार, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश सुपर 12 मध्ये आहेत. तर दुसरीकडे श्रीलंका, नमीबिया, वेस्टइंडीज आणि स्कॉटलंड या चार पैकी दोन दोन संघांना पात्रता फेरीत आपले बळ सिद्ध करून सुपर १२ मध्ये स्थान मिळवायचे आहे.
https://twitter.com/BCCI/status/1569290922449584130?s=20&t=L6ypKbPtRz7pt50Rl31eyg
यातच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार असणार आहे. दुसरीकडे के.एल. राहुल हा भारताचा उप कर्णधार असणार आहे. बरोबर संघात विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, जसपित बुमराह भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, हर्षदीप सिंग हे खेळाडू खेळणार आहेत. तर श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, दीपक शहर आणि रवी विष्णू हे राखीव खेळाडू असणार आहेत.