⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोठी बातमी : ‘तो’ परत येतोय.. चीनच्या १३ शहरांमध्ये १०० टक्के लॉकडाऊन

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । कोरोना परत गेला असल्याचे समजत बिनधास्त वावरणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरूवात झाली असून तब्बल १३ शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चीनचे 3 कोटी लोक मंगळवारी लॉकडाऊनमध्ये होते. वाढत्या विषाणुच्या कारणामुळे अनेक ठिकाणी लोकांची चाचणी देखील करण्यात येत आहे. अचानक झपाट्याने रूग्ण संख्या वाढत असल्याने चीनमध्ये चिंतेचं वातावरण आहे. चीनमध्ये मंगळवारी ५ हजार २८० नवीन कोविडची प्रकरणे नोंदवली गेली, जी संख्या आदल्या दिवशीच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, जिलिनचा ईशान्य प्रांत सर्वात जास्त प्रभावित झाला असून मंगळवारी 3,000 हून अधिक नवीन प्रकरण उघडकीस आली आहेत. राजधानी चांगचुनसह नऊ दशलक्ष लोकांना घरीच राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. शेन्झेन शहरात 17.5 दशलक्ष लोक आहेत. तिथले अनेक कारखाने बंद आणि सुपरमार्केटमध्ये तीन दिवस लॉकडाऊन आहे, तर चीनचे सर्वात मोठे शहर शांघाय शहरात कमी निर्बंध लादण्यात आले आहेत. अचानक कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने चीनने 13 शहर पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. तसेच चीनच्या इतर शहरात देशील विपुल प्रमाणात लॉकडाऊन करण्यात आला आहे. 2019 मध्ये चीनमध्ये पहिल्यांदा उदयास आलेल्या साथीच्या रोगाने चीनवरती आक्रमण केले त्यानंतर कोरोना संपुर्ण जगात पसरला.

चीनमध्ये अनेक ठिकाणी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने खळबळ व्यक्त केली जात आहे, रोज प्रकरण वाढत असल्याने चीन सरकार चिंतेत आहे. विषाणुचं प्रमाण वाढल्यानंतर विषाणु रोखण्यात यश येईल असा चीनच्या तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. निर्बंधामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली आहे. बीजिंग आणि शांघाय विमानतळावरील डझनभर देशांतर्गत उड्डाणे मंगळवारी सकाळी रद्द करण्यात आली. जिलिनच्या राज्यपालांनी सोमवारी रात्री आपत्कालीन बैठकीदरम्यान “एका आठवड्यात समुदाय शून्य-कोविड साध्य करण्यासाठी” सर्वतोपरी जाण्याचे वचन दिले आहे. चीनमध्ये सर्वत्र ओमायक्रॉनने आपले पाय पसरल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भारतात कोरोना नियंत्रणात असला तरी सरकारने आतापासून खबरदारी घेत उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोविडपासून बचावासाठी सध्या लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे. जळगावसह राज्यातील अनेक शहरात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने भविष्यात हे आपल्यासाठी घटक धोकादायक ठरू शकतात.