साईबाबांची पायी दिंडी लमांजन येथून रवाना

सप्टेंबर 10, 2022 8:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । श्री साईबाबा यांची पायी दिंडी रवाना झाली. याप्रसंगी दिंडीचे पूजन राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या 18 तारखेला ही दिंडी पायी प्रवास करून साईबाबांचे दर्शन घेणार आहे. दिंडीतील भाविकांनी सांगितले की, लमांजन येथून म्हसावद, डोमगाव, पाथरी, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा, पातोंडा, चाळीसगाव, नांदगाव मार्गे दिंडी अठरा सप्टेंबरला शिर्डी संस्थांमध्ये पोहोचेल.

vishal devkar

दिंडीच्या दौऱ्यादरम्यान भाविकांचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण याची व्यवस्था ठिकठिकाणी साई भक्तांनी केली आहे.मार्गस्थ होण्यापूर्वी दिंडीची पूजा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी जळगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बापू दादा परदेशी, निलेश पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, गोरख पाटील, रवींद्र पाटील, सुखदेव पाटील, महादू पाटील, देवाजी गुंजाळ, नाना पाटील, कैलास पाटील, संजू पाटील, सुधाकर सपकाळे, पाथरीचे माजी सरपंच निलेश पाटील, उखा पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र धनगर, रतिलाल सोनवणे, दादा पाटील, हिरामण सपकाळे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now