गुन्हेजळगाव जिल्हा

जळगावच्या दोन अल्पवयीन मुलींना पळवणाऱ्या तिघांना पुण्यातून अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । जळगाव तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन बहिणींना पळविल्याचा दाखल गुन्ह्यातील संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी तीन दिवसात आपली तपासचक्रे फिरवीत त्या दोन मुलीसह तीन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

दोन्ही बहिणी जळगावला काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्या एसएनडीटी महाविद्यालयमध्ये गेल्या होत्या. तेथून त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली होती. पोलिसांनी तीन दिवस अथक तपास करून त्यांचा माग काढला. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची देखील मदत घेण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून मुलींचा शोध घेण्यात आला. अखेर दोन्ही मुली पुण्यामध्ये आढळल्या तर त्यांच्यासोबत ३ संशयित तरुणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. वैद्यकीय तपासणी करून यातील मोठ्या बहिणीला शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात तर लहान बहिणीला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित जयेश देविदास सोनवणे (वय १९), हितेश रामसिंग शिरसाठ (वय २०) विवेक सुनील नन्नवरे (वय २१) सर्व रा. बांभोरी ता. धरणगाव अशा तिघांना अटक केली आहे. तपास एपीआय आर.डी. पवार करीत आहेत. दरम्यान, प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button