गुलाबराव पाटलांचे शिलेदार राजेंद्र महाजन यांचे निधन

सप्टेंबर 10, 2022 4:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक व शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांचे आज आकस्मीक निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे धरणगावाच्या राजकीय वातावरणात शोककळा पसरली आहे.

rajendra jpg webp

शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख, व्यंकटेश ॲग्रो एजन्सी चे संचालक, तथा माजी नगरसेवक राजेंद्र महाजन यांचे आज आकस्मीक निधन झाले. त्यांना रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मावळली.

राजेंद्र महाजन हे ना. गुलाबराव पाटलांचे कट्टर समर्थक होते. गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे सरकार सोबत जाताच त्यांनी पण आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते शिंदे व फडणवीस युती सरकारला समर्थन देऊन शिंदे गटात दाखल झाले होते. आगामी नगरपालिका निवडणुकीची धुरा देखील त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत होते. मात्र आज अचानक त्यांच्या निधनाने धरणगावात व जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now