गणेश विसर्जनात जिल्ह्यात.. पाच भाविकांचा मृत्यू!

सप्टेंबर 10, 2022 3:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्रासह जिल्ह्यात काल शुक्रवारी रोजी विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आले. श्रींची मिरवणुकीनंतर नदी, कालवे आणि धरणातून सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करताना जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्ब्ल तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घेटनेत चार अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

jalgaon 2022 09 10T152938.345

दुर्दैवी : बालक गणेश विसर्जन करताना पाण्यात बुडाला, गणेशभक्त तरुणाने उडी घेऊन बालकाचे प्राण वाचविले, मात्र..
किशोर राजू माळी (वय ३०) या तरुणाला कांग नदी पात्राच्या पुलावर गणपती विसर्जनासाठी आलेला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसले, त्यांनी लागलीच उडी घेऊन त्या मुलाचे प्राण वाचविले. मात्र किशोरचा बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला. किशोर या तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, लहान भाऊ असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माळी परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश विसर्जनाला घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जामनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुर्दैवी : खडकीचा बालक गणेश विसर्जनासाठी गेला, मात्र..
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावातील सौरव शत्रुघ्न मोरे (वय १७) हा श्री विसर्जनासाठी तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गेला, त्याने पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सौरव मोरेचा पाण्यात बुडू लागला तर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणार्‍या कामगारांनी धाव घेत सौरवला बाहेर काढले. मात्र, तो पर्यंत उशीर झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौरवच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परीवार आहे.

दुर्दैवी : कांताई बंधाऱ्यात तरूणाचा मृत्यू
जळगावच्या समता नगरातील भगवान नामदेव राठोड (वय १८) या तरूणाचा कांताई बंधाऱ्यात श्री विसर्जनादमऱ्यान बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दि.९ रोजी चार वाजेचच्या सुमारास घडली.

दुर्दैवी : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ धारागिर शिवारात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा अंत झाला. यात निलेश मिस्त्री (वय १७) व श्रवण पाटील (वय १५) या दोघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी घडली.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now