बाप रे.. चोरट्यांनी मारला गरोदर महिलांच्या आहारावर डल्ला!

सप्टेंबर 10, 2022 12:51 PM

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून नागिरकांमध्ये भीती पसरली आहे. आता तर रोजच चोरी होत असल्याचे समोर येत असून मुक्ताईनगर शहरातील एका अंगणवाडीत चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. यात ३ हजार रुपयाचा मुलांना आणि गरोदर महिलांना आहार चोरून नेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 27T155414.941 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने गावातील अंगणवाडी क्र. १८ मधील दि. ८ रोजी दुपारी १ ते ९ रोजीच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंगणवाडीच्या खोलीचा दरवाजाच्या कडीकोयडा तोडून लहान मुलं व गरोदर महिलांना वाटप विना शुल्क वाटप करण्यात येणारा कच्चा आहार कुणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. त्यामध्ये गहूचे १० पाकीट १ हजार रुपयाचा, हरभऱ्यांचे १० पाकीट ५०० रुपयांचा, साखरेचे ५ पाकीट २०० रुपयाचे, मिठाचे ५ पाकीट १०० रुपयाचे, मिरची पावडर ५ पाकीट १०० रुपयाचे याच्यासह स्टीलची भांडी, असा माल लांबविला आहे.

याप्रकरणी सुनिता विठ्ठल माळी (वय ५२) व्यवसाय अंगणवाडी सेविका (रा.इदगाह नगर, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसात अज्ञात व्यक्तीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनोद सोनवणे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now