थरारक.. वीज कोसळल्याने न्हावेत पित्यासह मुलाचा मृत्यू

सप्टेंबर 9, 2022 5:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथील शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या शेकऱ्याचा मुलासह अचानक वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. तर या घटनेत सुदैवाने महिला बचावल्या असून न्हावे गावात शोककळ पसरली आहे.

vij jpg webp

आबा शिवाजी चव्हाण (वय ४५) आणि मुलगा दीपक आबा चव्हाण (वय-१४) या दोघांचा मृत्यू झाला आहे. चव्हाण हे न्हावे गावात आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून त्यांची न्हावे शिवारात शेतजमीन आहे. त्यात यंदा कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार आज रोजी सकाळी आबा चव्हाण, पत्नी व मुलगा दीपक आबा चव्हाण (वय-१४) हे शेतातील कापसाला खत घालण्यासाठी गेलेले होते. त्यात दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लागल्याने तिघेजणे शेतातल्या शेवगाच्या झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली.

दरम्यान, या घटनेत आबा चव्हाण आणि मुलगा दिपक आबा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत महिला थोडक्यात सुदैवाने बचावल्या आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मयताच्या पाश्च्यात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now