पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ; जळगावात ‘या’ तारखेला अलर्ट जारी

सप्टेंबर 8, 2022 2:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । राज्यात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे तर काही ठिकाणी मात्र उघडीप दिल्याने उकाडा वाढला आहे. मात्र अशातच हवामान खात्याने आज (८ सप्टेंबर) पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान गणेश विसर्जनावर पावसाचे सावट निर्माण झाले असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. Rain Alert News Today

rain jpg webp

आज राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगावसह धुळे, नंदुरबार, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना वगळता सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा चटका बसत आहे. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याने काहीसा गारवा मिळत आहे. दरम्यान, उद्या (९ सप्टेंबर) गणेश विसर्जनाच्या दिवशी जळगावसह अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

असा असेल पावसाचा अंदाज

8 सप्टेंबर : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.

9 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट

10 सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

11 सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now