एसटीच्या कंत्राटी चालकांना महामंडाळात कायम स्वरूपी करा!

सप्टेंबर 7, 2022 5:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । जळगाव विभागाचे कंत्राटी बस चालकांना एसटी महामंडाळात कायम स्वरूपी करण्याची मागणी यावल आगाराचे चालकांनी आमदार शिरिष चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

st bus

संप काळात एसटी महामंडळात महाराष्ट्रात एकूण ८०० कत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, चालकांना कोणतेही सुचना न देता अचानक जळगाव विभागात वाहतूक विभागाने दि. ३ सप्टेंबर रोजी कत्राटी चालकांना कमी करण्याचे आदेश काढले. परिणामी चालकांनवर उपासमारिची वेळ आली आहे. त्यामुळे कंत्राटी बस चालकांना एसटी महामंडाळात कायम स्वरूपी करावे अशी आमदार आमदार शिरिष चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर नेहाल सय्यद, नितेश कोळी, मजर खान, कृष्णा वराडे, अमजत खान व अमीर पटेल यांच्या साह्य आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now