⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | दोन दिवसाच्या वाढीनंतर सोने-चांदीच्या किमतीत झाली घसरण ; पहा आजचे भाव?

दोन दिवसाच्या वाढीनंतर सोने-चांदीच्या किमतीत झाली घसरण ; पहा आजचे भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । जागतिक बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या वाढीला बुधवारी ब्रेक लागला. सलग दोन दिवस सोन आणि चांदीच्या भावात वाढ झाली होती. मात्र आज दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आलीय. आज बुधवारी सकाळी सोन्याचा भाव 230 रुपयांनी घसरला आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर 300 रुपयांहून अधिकने घसरला आहे.

MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेचे सोने सकाळी 10 वाजता 50,045 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​इतका होता. आज सोन्याचा व्यवहार 50,207 रुपयांपासून सुरू झाला. मात्र काही काळानंतर मागणी घटल्यानंतर घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 52,860 इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावातले दर :
जळगावातमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 47,200 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 51,450 रुपायांपर्यंत आला आहे. तर दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव 54,500 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,९३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५३९ रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.