..तर मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार : चंद्रकांत खैरे

सप्टेंबर 6, 2022 4:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । “गुलाबराव पाटलांना खोके मिळाले आहेत म्हणून तो आदित्य ठाकरेंवर बोलत आहे. मात्र मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, मी आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार आहे अस वादग्रस्त वक्तव्य औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

gualbrao patil chnadrakat patil 1 jpg webp

अधिक माहिती अशी कि, शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नुकताच निशाणा साधला होता. who is aditya thakre? असा सवाल गुलाबराव पाटीलांनी विचारला होता आणि जेव्हा मी शिवसेनेत होतो तेव्हा आदित्य ठाकरे जन्माला आलेले नव्हते असे पाटील म्हणाले होते. यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले कि, गुलाबराव पाटलांना खोके मिळाले आहेत म्हणून तो आदित्य ठाकरेंवर बोलत आहे. मात्र मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, मी आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now