मुक्ताईनगरात बसच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी; सायकलचा चक्काचूर

सप्टेंबर 5, 2022 12:36 PM

Muktainagar News । सुभाष धाडे । मुक्ताईनगर शहरात स्टेट बँकेजवळ एस.टी.बसने एका १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीला धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली. यात विद्यार्थीनी जखमी झाली असून सायकलचा चक्काचूर झाल्याची माहिती मिळाली आहे.

jalgaon 35

ऋतुजा राजेंद्र कोल्हे असे जखमी विद्यार्थीनी नाव आहे. शेगाव ते नवापूर बस (क्र.एमएच १४ बीटी ४१०) ही वेगाने जात असताना ऋतुजा राजेंद्र कोल्हे या विद्यार्थीनीला धडक दिली. यात सदर विद्यार्थीनीची सायकल पूर्णपणे चक्काचूर झाली असून ऋतुजा जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रूग्णालात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ऋतुजाला तात्काळ रूग्णालयात दाखल केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now