गणपती मंडळातच मारला चोरट्यांनी डल्ला!

सप्टेंबर 4, 2022 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । गणपती मंडळातच चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शहरातील पिंप्राळा शालिनी नगरात घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

crime 2022 09 03T132219.635 jpg webp

विवेके सोनार (वय २९, रा. शालिनी नगरा, पिंप्राळा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दि.१ सप्टेंबर रोजी रात्री १.३० ते सकाळी ६ वाजेदरम्यान संशयित आरोपी गोल्या जाधव, राकेश जाधव आणि परेश कोळी सर्व रा. पिंप्राळा, जळगाव यांनी सोनार यांच्या मालकीचा १३ हजार ८०० रुपये किमतीचे एम्फलिफायर, १० हजार रुपये किमतीचे स्पीकर, ७ हजार रुपये किमतीचे लाईट व ३ हजार रुपये किमतीचे फॉकस असे एकूण ३३ हजार ८०० रुपयांचा मद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी विवेके सोनार यांनी रामानंद नगर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी गोल्या जाधव, राकेश जाधव आणि परेश कोळी सर्व रा. पिंप्राळा, जळगाव यांच्याविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेश चव्हाण करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now