रायसोनी महाविद्यालयात गणरायाची पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते आरती
जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | संपूर्ण महाराष्ट्रात दोन वर्षानंतर गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते विविध मोठ्या पदांवरील शासकीय अधिकारी वेगवेगळ्या संस्थाच्या मंडळांना भेट देऊन आरती करत आहेत. या अनुषंगाने, समाजासाठी जनतेच्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र झटत असतात सणासुदीच्या काळात तर त्यांच्या सुट्ट्या हि रद्द केल्या जातात.
जनतेला सण उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही सणासुदीचा आनंद उपभोक्ता येत नाही. गणेशोत्सव हि त्याला अपवाद नाही. घरात गणपती असला तरी कर्तव्य व कामाचा भाग म्हणून सतत घराबाहेर राहावे लागते. घरातील गणपतीची साधी आरतीही त्यांना करता येत नाही त्यामुळे हि बाब लक्षात घेत, जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग ऑन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने प्रातिनिधिक स्वरुपात जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना १ ते ३ या काळात महाविद्यालयात स्थापन केलेल्या गणरायाच्या आरतीसाठी आमंत्रित केले हो
यावेळी रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ऑकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, जी. एच. रायसोनी कनिष्ट महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, शेखर पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील या गणेशोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत यासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.