भुसावळला उत्सव निर्विघ्नपणे पडणार पार..
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी ८८उपद्रवींना भुसावळ तालुक्यात येण्यास बंदी घालण्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढल्याने उपद्रवींच्या गोटात खळबळ उडाली आहे.
भुसावळ तालुक्यातील उपद्रवींमुळे शांतता भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांच्यावर उत्सव काळात तालुक्यात येण्यास बंदी आणण्याचे प्रस्ताव प्रांताकडे पाठविले होते. गणेशोत्सव काळात कुणीही उपद्रव करून समाजात अशांतता व तेढ निर्माण करू नये म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी प्रांताकडे उत्सव काळात उपद्रवी लोकांना बंदी घालण्याबाबतचे प्रस्ताव पाठवले होते.
या प्रस्तावांना ३१रोजी प्रांताधिकारी यांनी मंजुरी दिलेली असून ८८उपद्रवींना उत्सव काळात तालुक्यात येण्यास बंदी करण्यात आली. बाजारपेठमधील ५६, शहर पोलीस स्थानकांतर्गत २६तर तालुका अंतर्गत सहा अशा 88 उपद्रवींना १२सप्टेंबरपर्यंत शहरात येण्यास बंदी करण्यात आली. उपद्रवींना नोटीसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.