⁠ 
शनिवार, मे 4, 2024

पुणे-अमरावती विशेष गाडी आजपासून धावणार ; या स्थानकांवर आहेत थांबे?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२३ । दिवाळी निमित्त अनेक जण कुटुंबासह गावी चालले असून यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वे प्रसाशनाने पुणे – अमरावती – पुणे अशी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबर पासून ही विशेष गाडी धावणार आहे. ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असून तरी या गाडीची वेळ भुसावळच्या प्रवाशांसाठी गैरसोयीची आहे.

पुणे – अमरावती – पुणे ही विशेष गाडी 10 नोव्हेंबर ते 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत धावणार आहे या गाडीच्या एकूण 186 फेऱ्या होतील. ही गाडी नवीन निर्णयामुळे सकाळी 11 वाजता पुणेवरून निघेल तर मध्यरात्री 00.55 ला अमरावतीला पोहचेल. तर अमरावतीवरून रात्री 10:50 ला निघून सकाळी 11:25 वाजता पुण्याला येऊन थांबेल. गाडीला एकूण 17 एलएचबी डब्बे राहणार असून त्यामध्ये द्वितीय श्रेणी चेयर कार 13, एसी चेयर कार श्रेणी 1, स्लीपर श्रेणी 1, द्वितीय श्रेणी एसएलआरच्‍या 2 डब्‍यांचा समावेश असणार आहे. यामुळे प्रवाश्यांना चांगलाच फायदा होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

या स्थानकांवर थांबेल :
उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर,कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, काजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला आणि बडनेरा या रेल्‍वे स्‍थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे येथील प्रवाश्यांची प्रवासाची सोय झाली आहे.