⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

भुसावळमार्गे धावणार पुणे-कानपुर विशेष रेल्वे गाडी, ‘या’ स्टेशनावर थांबणार..

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२३ । देशभरात उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे एकंदरीतच रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातच पुणे ते कानपुर दरम्यान, विशेष रेल्वे गाडी धावणार आहे. ही रेल्वे भुसावळमार्गे धावणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

01037 पुणे – कानपुर
01037 क्रमांकांची पुणे – कानपुर एक्स्प्रेस ही विशेष गाडी 3 मे ते 15 जून दरम्यान दर बुधवारी सकाळी 6.35 वाजता पुण्याहून सुटेल. त्यानंतर दौड येथे सकाळी 7.38 ला पोहोचेल, अहमदनगर येथे 8.52 ला, त्यांनतर बेलापूर, कोपरगाव, मनमाडला ती दुपारी 13.10 वाजेल पोहोचेल. त्यांनतर भुसावळला ही गाडी 15.55 ला पोहोचेल, खांडवा येथे 18.02, इटारसीला रात्री 21.00, राणी कमलापती येथे रात्री 22.50 वा, बिना येथे रात्री 01.25 ला, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन येथे पहाटे 03.25 वा, ओराई येथे पहाटे 04.48 ला व कानपूर सेंट्रलला सकाळी 07.10 वाजेल पोहोचेल

01038 कानपुर – पुणे :
01038 कानपुर – पुणे ही गाडी 4 मे ते 16 जून दरम्यान दर गुरुवारी सकाळी 8:50 वाजता कानपूर सेंट्रलवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:05 वाजता पुण्याला पोहोचेल. कानपुर येथून निघाल्यावर ही गाडी ओराई येथे सकाळी 10.25वा, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन येथे दुपारी 13.25, बिना येथे सायंकाळी 16.15, राणी कमलापतीला सायंकाळी 18.40, इटारसीला रात्री 20.20 ला, खांडवा येथे 23.30, भुसावळ जंक्शनला रात्री 01.40, मनमाडला पहाटे 05.10, त्यांनतर कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड ला सकाळी 10.27 आणि पुणे येथे 12:05 वाजता पोहोचेल