जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । बदनामी कारक तथा लज्जा उत्पन्न होईल असे व्हिडीओ एका तरुणीला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात जामनेरच्या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मो.आकीब शे.मोहमद रफिक (रा.जुना बोदवड रोड जामनेर), असे संशयित आरोपीचे नाव आहे. पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, मो.आकीब शे.मोहमद रफिक याने दि.१४ ऑगस्ट ते १५ ऑगस्टच्या दरम्यान, पिडीतेच्या मोबाईलवर तिच्या नावाने बदनामीकारक व लज्जा उत्पन्न होईल असे स्टेटस व व्हिडीओ व्हॉटसअपवर पाठवले. या प्रकरणी मो.आकीब शे.मोहमद रफिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. महेंद्र उदेसिंग पाटील हे करीत आहेत.