कर्जोदला शेतातील विहिरीच्या पंपाची वायर लंपास

ऑगस्ट 31, 2022 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । रावेर तालुक्यातील कर्जोद येथील शेतात असलेल्या विहिरीवरील इलेक्ट्रीक पंपाची वायर अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 5

मनोज अरविंद पाठक रा.कर्जोद ता.रावेर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पाठक यांच्या येथील शेतातील सुमारे 85 फुट मोटर पंपाची केबल अज्ञात चोरट्याने लांबवली. मंगळवारी सकाळी शेतमालक मनोज पाठक शेतात गेले असता त्यांना केबल चोरीची बाब उघडकीस आली. याबाबत रावेर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now