पाय घसरून तापी पात्रात पडल्याने तरुण ठार

ऑगस्ट 31, 2022 10:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील २२ वर्षीय तरुणाचा पाय घसरून तापी पात्रात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दि. २८ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jalgaon 90 jpg webp

बळीराम थोरे (वय २२, रा.चांदसर ता. धरणगाव, जळगाव) असे मयत तरुणाचे नावं आहे. हा तरुण दि. २८ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास खेडी भोकरी शिवारात तापी नदी काठा वरून चिखलातून पाय घसरून नदीप्रवाहात पडला. दरम्यान, ही घटना दि.२९ रोजी सकाळी १०.३० उघडीस आली.याबाबत जळगाव तालुका पोलिसांत अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संदीप पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now