निंभोराला ग्रामीण पत्रकारांची स्नेहविचार सभा!

ऑगस्ट 29, 2022 10:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी कृषीतंत्र विद्यालय निंभोरा बु, येथे स्नेहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह विचार सभेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे हे होते.

jalgaon 8 2 jpg webp

तालुक्यातील निंभोरा बु. येथील कृषी तंत्र विद्यालयात काल दि.२८रोजी सकाळी ११.२० वाजता ही सभा संपन्न झाली. ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी पत्रकारिता करीत असतांना येणाऱ्या अडचणी व त्याचा होणारा परिणाम पत्रकारिता चा अनुभव याकरिता स्नेह विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार अनिल आसेकर यांनी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी यावर फार मोलाचे मार्गदर्शन केले. तालुक्यात ग्रामीण भागात पत्रकारांची भक्कम संघटना तयार करावे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात राजीव बोरसे यांनी संघटना मजबूत झाली तर पत्रकारांवर होणारे हल्ले थाबतील संघटनेचे महत्व त्यांनी उदाहरण देऊन पटवून सांगितले.

विनोद कोळी (शिवाभाऊ), राजीव बोरसे, प्रमोद कोंडे, ज्ञानेश्वर महाजन,अनिल आसेकर, प्रभाकर महाजन, विनायक जहूरे,संजय पाटील, विजय अवसरमल, इक्बाल पिंजारी, आकाश भालेराव, गणेश सेठी, प्रशांत पाटील, चंद्रकांत वैदकर, राहूल जैन,सागर तायडे, दस्तगीर खाटीक, संकेत पाटील, श्रीराम पाटील, दिलीप सोनवणे व असंख्य पत्रकार मित्र उपस्थित होते. कार्यकमाचे सूत्रसंचालन विजय अवसरमल तर आभार प्रदर्शन विनायक जहुरे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now