हद्दपार आरोपीला गुन्हे शाखेच्या शोध पथकाने केली अटक

ऑगस्ट 28, 2022 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेल्या आकाश उर्फ मटया अनिल बागडे याला एमआयडीसी शोध पथकाने शनिवारी अटक केली. बागडे हा शहरातील शिरसोली रोड, कृष्णा लॉन परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे मिळाली, त्यानुसार दि.२७ रोजी ५.३० वाजता शहरातील शिरसोली रोड, कृष्णा लॉन समोरुन सापळा रचुन ताब्यात घेण्यात आला आहे.

crime 2022 08 28T105948.109 jpg webp

आरोपी आकाश उर्फ मटया अनिल बागडे वय 27,रा.कंजरवाडा,आंबेडकर हॉस्टेल जवळ सिंधी कॉलणी जळगाव यास पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, तसेच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच सहा. पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, जळगाव भाग जळगाव व पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. आनंदसिंग धर्मा पाटील, पोना विकास मारोती सातदिवे, पोना योगेश देविदास बारी, पोकों मुकेश अनिल पाटील यांनी ही कारवाई केली. तपास पोना विकास सातदिवे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now