‘५०खोके एकदम ओके’ पोळानिमित्त सर्जा राजाची सजावट चर्चेत!

ऑगस्ट 27, 2022 11:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । जिल्हाभरात काल शुक्रवारी सर्जा राजांचा सण ‘बैलपोळा’ उत्साहात साजरा झाला. मात्र, काही सर्जा राजांनी चक्क ‘५०खोके एकदम ओके’ असे नाव लिहीत बैलाची सजावट केल्याचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे ‘५०खोके एकदम ओके’ या वाक्यांनी बैलाची सजावट केल्याने या वाक्यही प्रचंड चर्चा होत आहेत.

jalgoan

शेतकऱ्यांचा मित्र आणि शेतकऱ्यांचे ओझे वाहून नेणारा सण ‘बैलपोळा’ काल शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची सजावट करून त्याची पूजा करण्यात येते. तसेच गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. 

काल दि.२६ रोजी शुक्रवारी सर्जा राजांचा सण ‘बैलपोळा’ होता. त्यानिमित्त सर्जा राजांनी त्या त्या परीने बैलांची सजावट करून पोळा सण उत्साहात साजरा केला. मात्र, गेल्या काही महिन्यात राजकीय क्षेत्रात ‘५०खोके एकदम ओके’ या वाक्यची प्रचंड चर्चा होती. त्यांनतर काल शुक्रवारी पोळा सणानिमित्त सर्जा राजांनी पुन्हा ‘५०खोके एकदम ओके’ या वाक्याची आठवण करून दिल्याचे पाहायला मिळते आहे.

‘५०खोके एकदम ओके’ असे नाव लिहीत बैलाची सजावट केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहेत. त्यामुळे ‘५०खोके एकदम ओके’ या सजावटीची प्रचंड चर्चा होत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now