जळगावातील तरुणाला गावठी कट्ट्यासह पकडले!

ऑगस्ट 24, 2022 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । शहरातील कालिका माता मंदिराजवळ एका संशयिताला गावठी कट्ट्यासह जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटक संशयिताच्या विरोधात शनीपेठ पोलिस स्टेशनला मारामारीसह चॉपर बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत.

jalgaon crime 4 1

पराग राजेंद्र पाटील (वय 21, रा.तेली चौक साई बाबा मंदिराजवळ, शनिपेठ, जळगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील कालिका माता मंदीर परीसरात एक संशयीत गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना कळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पथकाने कारवाई करीत संशयीताकडून 30 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त केले. संशयीतला पुढील तपासकामी शनीपेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक नितीन बावीस्कर, प्रीतम पाटील, अविनाश देवरे आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now