धक्कादायक : जळगावात महादेवाच्या पिंडीची विटंबना, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ऑगस्ट 23, 2022 11:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । शहरातील मुकुंदनगराच्या परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या ओट्यावरील महादेवाच्या पिंडची कुणी तरी अज्ञात भामट्याने तोडून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 3 jpg webp

राघो बाबुराव पाटील (वय ६५, रा.मुकुंदनगर, जळगाव) यांनी रामानंदनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली. पाटील यांच्या घराच्या परिसरात हनुमानाचे मंदिर असून त्याच्या ओट्यावर महादेवाची पिंडी आहे. त्या पिंडीला कुणी तरी अज्ञात भामट्याने तोडून विटम्बना केल्याचा धक्कदायक प्रकार दि. २२ रोजी सकाळी ५ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, पाटील यांनी सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्याने रामानंदनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उषा सोनवणे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now