जळगाव जिल्हा

आ.सुरेश भोळे यांच्या माध्यमातून हजारांवर शिधापत्रिका वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २२ ऑगस्ट २०२२ | राज्यशासनाच्या विविध काल्याणकारी योजनासर्व सामान्य गोर गरीब तसेच गरजुलोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी आ.सुरेश भोळे यांच्या जळगाव येथील नुतून मराठा महाविद्यालयाच्या व्यापारी संकुलातील कार्यालयाच्या माध्यमातून आता पर्यंत शहरी व ग्रामस्थांना हजारो शिधापत्रिकांचा वाटप केला.

यासाठी त्यांनी श्री.कैलास धुरेकर यांची सहायक म्हणून नियुक्ती केल . गेले वर्षभर केशरी , पांढऱ्या शिधापत्रिका तयार करून कार्यालयमार्फत त्याचे विना मोबदला केवळ शासकीय चलन फी भरून वितरण केले जात आहे . कोणत्याही प्रकारच्या नवीन शिधापात्रिका मिळविण्यासाठी सर्व सामान्य जनतेला तहसील कार्यालयात अथवा पुरवठा विभागात तारेवरची कसरत करावी लागते . एवढे करून देखील गरजूंना लवकर शिधापत्रिका मिळत नाही . यासाठी आमदार भोळे यांनी स्वस्त धान्य दुकानातून गरीब कुटूम्बियांना लवकर शिधापत्रिका मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

नुकतेच बळीराम पेठेतील भा.ज.पा कार्यालयात ममुराबाद येथील गरीब व गरजू लोकांना आ . राजूमामा भोळे यांच्या हस्ते केसरी शिधापात्रीकांचे वितरण करण्यात आले . या वेळी ममुराबाद च्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे . तसेच एक हजाराच्या वर बारा अंकी धान्य सुरु करण्यासाठी व्यापकप्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहे . या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आ . राजूमामा भोळे ,नगरसेवक विशाल त्रिपाठी , माजी नगर सेवक प्रदीप रोटे , विनोद आढळके , खंडू महाले ,सहायक कैलास धुरेकर यांच्या सह विविध पदाधिकारी उपस्थित होते .

Related Articles

Back to top button