‘लंपी’च्या सावटाखाली भरला बाजार, बैलांचे साज खरेदीत मंदी, व्यापारी चिंतेत!
जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक स्रावगे । शेतकऱ्यांच्या मित्र असणारा बैल याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा, अवघ्या चार दिवसाद म्हणजे दि.२६ शुक्रवार रोजी सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार आहे. पोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याची दुकाने देखील बाजारपेठेत सजली आहे. मातीचे बैल विक्री करणारे व्यापारी देखील निरनिराळे व विविध रंगी बैल जोड्या घेवून बाजारात दाखल झाले आहेत.
पंरतु, जिल्ह्यासह ग्रामीणच्या काही भागात ‘लंपी’ या गुरांच्या रोगाचे संकट आले आहेत. त्यामुळे बैलांचे साज खरेदी, सजावट साहित्य व इतर खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात मंदी दिसत असल्याने व्यापारी चिंतेत पडले आहेत.
सावदा येथे देखील पोळ्यानिमित्त रविवारच्या आठवडे बाजारात बैलांचे साज विक्री करणाऱ्या दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहे. परंतु, दरवर्षी मोठ्या उत्साहात असणारा हा बाजार यंदा मात्र गुरांवर आलेल्या लंपी स्किन च्या सावटा खाली भरला आहे. यामुळे बैलांचे साज खरेदी तसेच सजावट साहित्य व इतर खरेदी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात मंदी दिसत असल्याने व्यापारी चिंतेत पडले आहेत.
तसेच यानंतर बुधवारी फैजपूर येथे भरणार बाजार चांगला भरेल अशी आशा व्यापारकडून व्यक्त होत आहेत, एकूणच जिल्ह्यासह ग्रामीणच्या काही भागात ‘लंपी’ या गुरांच्या रोगाचे संकट आले आहेत. त्यामुळे कोरोना नंतर मालाच्या वाढलेल्या किमती याचा परीणाम मात्र विक्रीवर दिसत आहेत.