धक्कादायक : शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आणि..

ऑगस्ट 22, 2022 4:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । यावल तालुक्यातील सांगवी खुर्द शिवारात रस्त्यावर शेतकऱ्याला दोन जणांनी मारहाण करून खिशातील महागडा मोबाईल काढून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत यावर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 1 jpg webp

सुनील निवृत्ती चौधरी (वय ४७, रा. अट्रावल ) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. चौधरी हे आपल्या कुटुंबीयांसह सदर ठिकाणी वास्तव्याला आहे. रविवार २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सांगवी खुर्द शिवारात त्यांच्या शेतात काम करत असताना अज्ञात दोन तरुण त्या ठिकाणी आले. येऊन काही कारण नसताना त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून घेतले व सोबत मोटरसायकलची चावी देखील घेऊन पळून गेले.

या संदर्भात सुनील चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now