जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर येथील पंचायत समिती सभागृहात सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने राजभाजी महोत्सव आयोजित करण्यात आले, उद्घाटन आ. शिरीष चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे ४० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रानभाज्या बाबत आमदार शिरीष चौधरी यांनी मार्गदशन केले. महोत्सवात विशेष कुंजुरु, राजगिरा काटेरी माट, केना, अंबाडी पाथरी, फांगची भाजी, आघाडा, तरोटा, गोखरू बांबुची कोम, लाल माह, मोह, शेवगासह विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, हरीष गनवानी, ज्ञानेश्वर पाटील, गुणवंत सातव, संतोष पाटील बावणे ( आरएफवो ) डॉ. धिरज नेहते, डॉ. अतुल पाटील सह आदी उपस्थित होते.