अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, नराधमांना २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

ऑगस्ट 20, 2022 7:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । शहरातील एका परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दोन नराधमांनी गोशाळेत फिरायला जायचे सांगत एमआयडीसी परिसरातील एका शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी गणेश सुर्वे (वय २०) व प्रकाश नागपुरे (वय २२, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.महाजन यांच्या न्यायालयाने दोघांना शनिवारी २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ४५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली.

court 1 1 jpg webp

शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलगी वास्तव्यास असून दि.२४ नोव्हेंबर २०१९ रोजी आरोपी गणेश कमलाकर सुर्वे (वय २०) व प्रकाश सुरेश नागपुरे (वय २२, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी पीडितेला गोशाळेत फिरायला रिक्षात घेऊन गेले होते. तेथून त्यांनी पीडितेला एका शेतात नेऊन दोघांनी अत्याचार केला. याप्रकरणी पिडीतेने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी गणेश सुर्वे (वय २०) व प्रकाश नागपुरे (वय २२, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपी गणेश सुर्वे (वय २०) व प्रकाश नागपुरे (वय २२, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना अटक केली. याप्रकरणी विशेष पोस्को न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयासमोर खटल्याला सुरुवात झाली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित व डॉक्टर यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व विशेष सहकारी ऍड. चारुलता बोरसे यांनी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला.

न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तीवाद यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी धरले आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ४५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. याकामी पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले. आरोपीतर्फे विधिज्ञ सागर चित्रे व ऍड.मंजुळा मुंदळा यांनी काम पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now