⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | खा.उन्मेष पाटलांचा पुढाकार : वडाळे-वडाळी ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार!

खा.उन्मेष पाटलांचा पुढाकार : वडाळे-वडाळी ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील वडाळे-वडाळी येथील मध्यरेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम गेल्या वर्षंभर पासून सुरू आहे. वडाळे ते हिंगोणे मार्गावर वाहतुकीसाठी पारंपरिक चालत असलेला रस्ता बंद करून बोगद्याच्या काम रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. मात्र, यामुळे वडाळे गावात येणार्‍या जाणार्‍या मोठया वाहनांना दळणवळणचा मार्ग अडचणीचा होणार असल्याने ग्रामस्थांनी खा.उन्मेष पाटील यांच्याकडे साकडे घातले होते. अखेर खा.उन्मेष पाटील यांनी येथील रेल्वे अंडरपासमुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

तालुक्यातील वडाळे-वडाळी येथील मध्यरेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम गेल्या वर्षंभर पासून सुरू आहे. वडाळे ते हिंगोणे मार्गावर वाहतुकीसाठी पारंपरिक चालत असलेला रस्ता बंद करून बोगद्याच्या काम रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. मात्र, यामुळे वडाळे गावात येणार्‍या जाणार्‍या मोठया वाहनांना दळणवळणचा मार्ग अडचणीचा होणार असल्याने ग्रामस्थांनी खा.उन्मेष पाटील यांच्याकडे साकडे घातले होते. दरम्यान, खा.उन्मेष यांनी रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना प्रत्यक्ष कार्यस्थळावर जावून जनतेच्या अडचणी समजावून मार्ग काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रेल्वेचे अधिकारी एडीईएन पि.डी.वाडेकर, रेल्वे अभियंता राहुल पाटील यांनी येथे भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर जोवर या प्रकरणी मार्ग निघत नाही, तोवर या अंडरपासचे काम बंद राहील असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा डी.आर.यु.सी. मेंबर के बी साळुंखे, दरेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी सभापती दिनेश बोरसे,धर्माआप्पा अहिरराव यांच्यासह गावकरी अशोक आमले, निलेश अहिरराव ,संजय आमले, विकास आमले, बापू आमले, सुशील आमले, किशोर शेवरे, शांताराम अहिरराव, काशिनाथ सूर्यवंशी, समाधान आमले, रितेश आमले, पोपट अहिरराव, रघुनाथ आमले, रवींद्र सूर्यवंशी ,सुरेश आमले, भारत आमले, सुनील अहिरराव, राजेंद्र आमले, भूपेंद्र अहिरराव, मुकेश कासार, पत्रकार भोजराज आमले इ. सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह