जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिलेल्या एका मोठ्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी राज्यात सरपंचाची निवड जनतेतून होणारे विधेयक मजुंर करण्यात आले.यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या विधेयकामुळे थेट संरपंच निवड जनतेतून होताना पाहायला मिळणार आहे.

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून शिंदे -फडणवीस सरकारचे हे पाहिलंच अधिवेशन आहे. यावेळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळेल. दरम्यान, शिंदे सरकारने आधीच्या सरकारने घेतला निर्णय आता मोडीत काढला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मंत्री गिरीष महाजन यांनी मांडले आणि विधेयक बहुमताने पारीत करण्यात आले. या विधेयकामुळे थेट संरपंच निवड जनतेतून होताना पाहायला मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस सरकार असताना थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं सत्तेत आल्यावर रद्द केला होता. पण आता शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने रद्द केला निर्णय पुन्हा एकदा बदला आहे. काही दिवसांपूर्वीचं एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.












