⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत बंपर भरती ; जाणून घ्या योग्य पात्रता?

भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत बंपर भरती ; जाणून घ्या योग्य पात्रता?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NALCO Recruitment 2022 : भारत सरकारच्या नवरत्न कंपनीपैकी एक नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड,NALCO ने पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट nalcoindia.com ला भेट देऊन पदांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. 11 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 11 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

रिक्त पदांचा तपशील :
एकूण १८९ पदे भरती प्रक्रियेद्वारे भरायची आहेत. यामध्ये सिव्हिलच्या 7, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 32, केमिकलच्या 14, मेकॅनिकलच्या 58, इलेक्ट्रिकलच्या 41, केमिस्ट्रीच्या 13, मायनिंगच्या 10 आणि मेटलर्जीच्या 14 पदांचा समावेश आहे.

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता
संबंधित विषयातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पूर्णवेळ बॅचलर पदवी धारण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये उमेदवारांना किमान ६५% गुण असावेत. तथापि, रसायनशास्त्राच्या पदांसाठी, 65 टक्के गुणांसह एमएससी रसायनशास्त्र पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे GATE 2022 स्कोअर कार्ड असणे आवश्यक आहे.

वय श्रेणी
11 सप्टेंबर 2022 रोजी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे असावे.

निवड प्रक्रिया
GATE परीक्षेत मिळालेले गुण आणि वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.