स्वातंत्र्य दिनामित्ताने सावदा येथे विविध कार्यक्रम उत्साहात साजरा

ऑगस्ट 16, 2022 1:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । सावदा येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या दिनामित्ताने नगरपालिका, पोलिस ग्राउंड, इंदिरा गांधी चौकात, प्राथमिक विद्या मंदिरात अश्या विविध ठिकाणी मुख्याधिकारी किशोर चव्हाण व पीएसआय समाधान गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सूत्र संचालन करून शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी नागरिक,आदीसह उपस्थीत होते,

rayli

या प्रसंगी आ.ग. हायस्कूल व ना.वि.ह. पाटील कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनिनी आझादी अमृत महोत्सवा निमित्ताने तिरंग्या विषयी जनजागृतीपर सुंदर पथनाट्य सादर केले. यानंतर संभाजी चौकात भारत मातेच पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यधिकारी किशोर चव्हाण, माजी नगराध्यक्षा अनिता येवले, हेमांगी चौधरी, ताराबाई वानखेडे, राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक अजय भारंबे, शाम अकोले सिद्धार्थ बडगे, माजी नगरसेविका सुभद्राबाई बडगे, लीना चौधरी, रंजना भारंबे, जयश्री नेहेते, मीनाक्षी कोल्हे, रेखा वानखेडे, नंदाबाई लोखंडे, करुणा पाटील, निलिमा बेंडाळे, नेहा गाजरे यांचे सह पदाधिकारी, व नागरिक उपस्थित होते यावेळी विद्यार्थाना नागरिकांना विविध खाद्याचे दुधाचे पाकीट वाटप मानवरांच्या हस्ते करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now