⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ ; त्वरित चेक करा नव्या किमती?

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ ; त्वरित चेक करा नव्या किमती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२२ । मंदीच्या आशंकेने मागील गेल्या काही सत्रात सोन्याच्या (Gold Price) किंमतीत वाढ होत आहे. तसेच गुंतवणूकदारांनीही सोन्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या किंमतीत बरीच वाढ झाली आहे. दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या (Silver Price) भावात मोठी वाढ झाली आहे. आज सोने २४३ रुपयाने वधारले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात तब्बल ९२२ रुपयांनी महागली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. Gold Silver Rate Today

जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९ हजार रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३ हजार ५०० रुपयावर इतका आहे. तर चांदी ६१ हजार रुपयांवर आली आहे. (हे सोन्याचे दर सूचक आहेत अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे दर?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,१५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,५३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,१८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,१८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,५८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,१८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,५८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९३ रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.