स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सुकळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य वृक्षदिंडीने वेधले लक्ष

ऑगस्ट 14, 2022 12:23 PM

जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | पर्यावरण तसेच वृक्षसंवर्धन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी परीसरातील शाळा अर्थातच मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालय व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यामानाने आज दि १३ रोजी भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.दहावीची विद्यार्थीनी मिनाक्षी पाटील या विद्यार्थीनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

janaganamana jpg webp

यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा विद्यार्थांनी घेतली.वृक्षदिंडीच्या या समारंभामध्ये वडोदा वनक्षेत्रपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्यासह वनकर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.तसेच जि.प.शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांही हाती रोपटे घेऊन सहभागी होते.पालखी फुलांनी सजवुन त्यात रोपटे ठेवले होते.विद्यार्थ्यांनी हातात वृक्षसंवर्धनाचे फलक तसेच काहींनी तिरंगा ध्वज घेऊन, वृक्षसंवर्धनाचे घोषवाक्यांची घोषणा देत,लेझीम खेळत ढोल ताशांच्या गजरात गावातुन वृक्षदिंडीची मिरवणुक काढली.झाडांबाबत असलेले महत्व लोकांना कळावे, वृक्षतोड बंद व्हावी व अधिकाधिक संख्येने वृक्षलागवड व्हावी, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल टिकुन रहावा.याबाबत जनजागृती करण्यात आली.

चिमुकल्यांनी केलेल्या घोषणाबाजीने समाजमन पुरतं भारावलं होतं. मिरवणुकीअंती सुमारे शंभर रोपे लावण्यात आली.वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, संस्थेचे सचिव दिलीप पानपाटील व मुख्याध्यापक प्रदिप दाणे यांनी भाषणाद्वारे विद्यार्थांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजवुन सांगितले. प्रसंगी वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे,वनपाल दिगंबर पाचपांडे,मराठे,वनरक्षक बापुसाहेब थोरात,अहिरे, दिपाली बेलदार, चालक महेंद्र पुरकर यांच्यासह वनकर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच सचिव दिलीप पानपाटील, मुख्यध्यापक प्रदिप दाणे, डि एम फेगडे, एस एम बोदडे, एस बी चौधरी, व्ही आर काकडे, एम डी दांडगे, एस एस पावरा, एम वाय सपकाळे, नवल कोळी, अनिल चौधरी, शिक्षिका व्ही ए सोनवणे, माजी पंचायत सभापती विकास पाटील, पो.पाटील संदिप इंगळे, नितीन पाटील, निवृत्ती कोळी, संजय पाटील, सुनिल पाटील, प्रकाश कोळी या़ंच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now