मी जर माझा तिसरा डोळा उघडला तर : गुलाबरावांचा विरोधकांना इशारा

ऑगस्ट 13, 2022 8:59 PM

gulabrao patil 7 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । आज पर्यंत मी कोणाशीही वाईट वागलो नाही कोणाविरुद्धही मंत्री पदाचा दुरुपयोग केला नाही. कारण तो माझा स्वभाव नाही. विरोधक जरी माझ्यासमोर आला तरी पण त्याच्या पाया पडलो. विरोधकांची ही मंत्री असताना मोठी काम केली. मात्र मी मंत्री होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर काही लोकांनी माझ्याविरुद्ध कारस्थान केल आहे. त्या लोकांना माहीत नाही की मी जर ‘तिसरा डोळा उघडला’ तर मी काय करू शकतो अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर आगपाखड केली. आज ते एका सभेत बोलत होते.

ना. गुलाबराव पाटील यांनी लागोपाठ तिसर्‍यांना मंत्रीपदाची तर दुसर्‍यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आज शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी ते जिल्ह्यात पहिल्यांदा येणार असल्याचा दौरा अधिकृतपणे जाहीर होताच त्यांच्या अभूतपुर्व स्वागताचे नियोजन करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील हे आज सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून निघाले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडी कोंडव्हाय फाटा येथे त्यांची जळगाव जिल्ह्यात एंट्री झाली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांनी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो समर्थकांनी ना. गुलाबराव पाटील यांचा स्वागत केले.

या यात्रेच्या सुरवातील माजी सैनिकांचे वाहन असू ते तिरंगा झेंड्यासह सुशोभीत करण्यात आले होते. यामागे ना. गुलाबराव पाटील यांचे वाहन, मागे पोलिसांची वाहने आणि यामागे सुमारे पाचशे चारचाकी वाहनांचा ताफा अमळनेर शहराकडे निघाला. हा ताफा तब्बल सात किलोमीटर इतका लांब होता. दरम्यान, वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बंदोबस्त ठेवून अचूक नियोजन केले होते.



Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now